Who is Sonal Dinusha? भारताविरुद्ध दोन सामन्यात तीन शतकं ठोकणारा दिनूशा आहे तरी कोण? श्रीलंकेला सापडलाय हिरा

Know About Sonal Dinusha : भारताविरुद्ध कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून सोनल दिनूशाने तीन शतके केली. कोलंबो कसोटीत तर विजय आणि भारतीय संघाच्या मध्ये तो भक्कमपणे उभा राहिला होता.
Sri Lanka vs India Test

Sonal Dinusha | Sri Lanka Cricketer

Sakal

Updated on

Sri Lanka vs India Test Marathi News: श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत विजय आणि भारतीय संघाच्या मध्ये सोनल दिनूशा उभा ठाकलेला. त्याच्या दुहेरी शतकांमुळे भारतीय संघाला या कसोटीत अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. पण भारताने ही मालिका १-० अशी जिंकली.

पण असे असले तरी या मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक ४२० धावा करणाऱ्या २५ वर्षीय दिनूशाने (Sonal Dinusha) सर्वांनाच प्रभावित केले. कोलंबोत झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात १०३ धावांची खेळी केली होती. पण त्याहीपेक्षा दुसऱ्या डावात त्याने दिलेली झुंज कमालीची होती.

Sri Lanka vs India Test
IND vs SL, 2nd Test : मोहम्मद सिराजला कोलंबो कसोटीत दुखापत होती का? अखेर कर्णधार शुभमन गिलनेच केला खुलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com