IPL 2027 Auction: England pacer Sonny Baker attracts interest from LSG and PBKS
esakal
Why are LSG and PBKS interested in Sonny Baker? इंडियन प्रीमिअऱ लीग २०२७ साठी पुढील महिन्यात गोवा येथे मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व दहा फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यात कायम राखलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्याआधी काही मोठे ट्रेड पाहायला मिळाले. आता सर्व फ्रँचायझी लिलावासाठी सज्ज झाल्या आहेत आणि एका २३ वर्षीय जलदगती गोलंदाजासाठी आतापासूनच रस्सीखेच होताना दिसतेय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सोनी बेकर हा लिलावात आपलं नाव नोंदवणार आहे आणि अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक आहेत.