

Suchika Tariyal Wins Historic First MMA Bronze for India in Asian Games 2026
Sakal
Suchika Tariyal Wins Historic First MMA Bronze for India in Asian Games 2026: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताच्या सुचिका तारियाल हिने ऐतिहासिक पदक जिंकले आहे. तिने महिलांच्या ट्रॅडिशनल मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली.
तिला उपांत्य फेरीत सिंगापूरच्या तेओ हुई हून हिने २-१ अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जात असल्याने तिला हे पदक मिळाले आहे.