Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

Ajit Agarkar replacement as BCCI chief selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने टीम इंडियाच्या निवड समितीच्या प्रमुखपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
AJIT AGARKAR

WHO WILL REPLACE AJIT AGARKAR? BCCI SHORTLISTS TWO CANDIDATES FOR SELECTOR POST

esakal

Updated on

who will replace Ajit Agarkar as chief selector? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी नवीन माणसाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अजित आगरकरच्या अध्यक्षपदाखाली बुधवारी निवड समितीची शेवटची बैठक झाली आणि त्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी इराणी ट्रॉफीसाठी शेष भारताचा संघ व आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात दोन बदल जाहीर करण्यात आले. या बैठकीनंतर अजित आगरकच्या जागी कोण? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. आगरकचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरपर्यंत आहे आणि त्याला २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत मुदतवाढ मिळेल असे वाटत होते, परंतु रोहित शर्माशी घेतलेला पंगा महागात पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com