Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Who will replace Rohit Sharma in India's ODI team? रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत चर्चा रंगत असतानाच त्याचा उत्तराधिकारी कोण, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. वृत्तांनुसार, बीसीसीआयची निवड समिती २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने युवा खेळाडूंवर भर देण्याच्या तयारीत आहे.
Yashasvi Jaiswal likely successor to Rohit Sharma

Yashasvi Jaiswal likely successor to Rohit Sharma

esakal

Updated on

BCCI plans after Rohit Sharma retirement: भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात विजयासाठी खिंड लढवत असताना रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी समोर आली. लॉर्ड्सवर १९ जुलैला होणारा तिसरा वन डे सामना हा रोहितचा शेवटचा असल्याचे वृत्त येऊन धडकले अन् क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली. २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रोहितला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप जिंकायचा होता. पण, त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. २०२३ मध्ये तो या स्वप्नाच्या अगदी जवळ पोहोचलेला, परंतु ऑस्ट्रेलियाला त्याचे सुख पाहावले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com