

Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A
Sakal
सोमवारी (१६ जून) डंबुला येथे भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात झालेल्या तिरंगी वनडे मालिकेतील सामना अत्यंत रोमांचक आणि नाट्यमय झाला. निर्धारित षटकांनंतर बरोबरी झाल्यानंतर या सामन्यात सुपर ओव्हर झाली, ज्यात श्रीलंका अ संघाने बाजी मारली. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीचेही श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत वाद झाले, ज्याची बरीच चर्चा झाली. त्या घटनेनंतर वैभववर कारवाईही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.