BCCI — गौतम गंभीर व अजित आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली — २०२७ वर्ल्ड कप लक्षात घेऊन संघात परिवर्तनाची तयारी करत आहे.
विराट कोहली व रोहित शर्मा २०२७ अगोदर निवृत्ती घेतल्यास त्यांच्या जागी तरुण पिढीला संधी मिळेल.
शुभमन गिल हा पुढील ODI कर्णधार किंवा संघाचा मुख्यAnchoring बॅट्समन बनण्याच्या पटावर आहे.
भारतीय संघ पुन्हा एकदा परिवर्तनाच्या तयारीत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI), गौतम गंभीर ( Gautam Gambhir) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी भविष्याचा विचार करून पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन सीनियर खेळाडू वन डे क्रिकेटमधूनही केव्हाही निवृत्ती जाहीर करू शकतील. या दोघांचं वय त्यांच्या मार्गातला अडथळा बनला आहे आणि समोर २०२७चा वन डे वर्ल्ड कप असल्याने संघ व्यवस्थापन तयारीला लागले आहेत. रोहित व विराट यांनी निवृत्ती घेतल्यास त्यांची जागा कोण घेईल?