Ben Stokes | CSKSakal
Cricket
Ben Stokes ने का घेतला IPL न खेळण्याचा निर्णय? म्हणाला, 'माझं करियर आता...'
Ben Stokes revealed why didn't participate in IPL auction: बेन स्टोक्सचे नाव आयपीएल २०२५ लिलावात नव्हते. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. पण त्याने आता आयपीएल न खेळण्याचा निर्णय का घेतलेला, हे सांगितलं आहे.
IPL auction 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलाव जेद्दाह येथे पार पडला, या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. दरम्यान, या लिलावातून एक मोठं नाव गायब होतं, ते नाव म्हणजे बेन स्टोक्स.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने या लिलावासाठी नाव नोंदवलं नव्हतं. त्यामुळे तो लिलावातही दिसला नाही. अनेकांना त्याच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले. या लिलावासाठी ५२ इंग्लिश क्रिकेटपटूंनी नाव नोंदवलं होत. पण स्टोक्सने हा निर्णय घेणं टाळलं.