तुम्ही सर्व, गौतम गंभीरला जबाबदार का धरत आहात? सुनील गावस्करांकडून बचाव; आर अश्विन म्हणाला, कोच हातात बॅट घेऊन...

Sunil Gavaskar defended Gautam Gambhir: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या व्हाईटवॉशनंतर सोशल मीडियावर आणि विश्लेषकांकडून गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. पराभवाचा संपूर्ण दोष मुख्य प्रशिक्षकावर टाकण्याचा प्रयत्न होत असतानाच दोन मोठ्या दिग्गजांनी गंभीरचा खुला बचाव केला आहे.
Sunil Gavaskar and R Ashwin publicly defended head coach Gautam Gambhir

Sunil Gavaskar and R Ashwin publicly defended head coach Gautam Gambhir

esakal

Updated on

What R Ashwin said about criticism of India’s head coach? भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आणि माजी महान फिरकीपटू आर अश्विन हे दोघंही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर गौतमवर टीका होऊ लागली आहे आणि अनेकांनी त्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. गौतमच्या मार्गदर्शनाखाली भारताने मागील १२ महिन्यांत घरच्या मैदानावर दोन व्हाईटवॉश स्वीकारले. त्यामुळे त्याने हे पद सोडावे, अशी मागणी होत आहे. गौतमने मात्र स्वतःचा बचाव केला आणि त्याच्याच कार्यकाळात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकल्याचे आठवण करून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com