Why are Mohammed Siraj and Ravindra Jadeja missing from India's playing XI in the first Test against New Zealand? Know the big selection reasons explained by captain Shubman Gill
esakal
Why Did India Drop Mohammed Siraj Despite His Impressive Performances? केप टाऊन कसोटीत ६ विकेट्स, गॅबावर ५, एडबस्टनवर ६, ओव्हलवर ९ आणि लॉर्ड्सवर ८ असे परदेश दौरे गाजवणारा मोहम्मद सिराज IND vs NZ 1st Test च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि सिराज व रवींद्र जडेजा या सीनियर खेळाडूंना न खेळवण्याचा निर्णय चक्रावणारा होता. भारतीय कर्णधार शुभमन गिल याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम ११ मध्ये सिराज व जड्डूचा समावेश नसल्याचे त्याने जाहीर केले.