
शनिवारी (१८ जानेवारी) भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच त्याआधी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा झाली आहे.
या संघात काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर काही खेळाडूंना मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.