IND vs AFG: जडेजाची टीम इंडियात निवड का नाही? रिषभ पंत ऐवजी केएल राहुलकडे कसोटीचं उपकर्णधार का दिलं? आगकरांनी सर्व स्पष्टच सांगितलं

Ajit Agarkar Clarifies Selection call on Jadeja and Rishabh Pant: अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली. पण यात रवींद्र जडेजाला निवडण्यात आले नाही, तसेच रिषभ पंतकडूनही कसोटी उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
Ravindra Jadeja - Rishabh Pant | Team India

Ravindra Jadeja - Rishabh Pant | Team India

Sakal

Updated on

IND vs AFG, Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानतर जूनमध्ये होत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची (Team India) निवड मंगळवारी (१९ मे) जाहीर करण्यात आली. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली, ज्यात मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनुर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे.

यावेळी रिषभ पंतला दुहेरी धक्का बसला. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी संघात स्थान राखले, परंतु उपकर्णधारपद गमावले. त्याचबरोबर एकदिवसीय संघातूनही त्याला दूर करण्यात आले. रिषभ पंत या अगोदर कसोटी संघाचा उपकर्णधार होता.

Ravindra Jadeja - Rishabh Pant | Team India
IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com