IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

Why Shreyas Iyer not banned IPL 2026 slow over rate rule? आयपीएल २०२६ मध्ये श्रेयस अय्यर याच्याशी संबंधित एक महत्त्वाचा नियम चर्चेत आला आहे. संथ षटकगती (slow over rate) बाबत तिसऱ्यांदा चूक करूनही त्याच्यावर बंदीची कारवाई होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
Why Shreyas Iyer will not face a ban despite a third slow over-rate offence in IPL 2026.jpg

Why Shreyas Iyer will not face a ban despite a third slow over-rate offence in IPL 2026.jpg

esakal

Updated on

IPL new rules for captains over rate penalties explained: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याच्यावर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दुसऱ्यांदा संथ षटकगती ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा चुक केली, तेव्हा त्याला १२ लाखांचा दंड भरावा लागला. काल, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून ही चूक झाली आणि IPL नियमानुसार त्याच्यावर २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला, तर प्लेइंग इलेव्हनमधील अन्य खेळाडूंना ६ लाख किंवा मॅच फीमधील २५ टक्के ( जी कमी असेल ती) रक्कम दंड म्हणून भरावी लागली. आता श्रेयसने तिसऱ्या सामन्यांत पुन्हा ही चूक केली, तर त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल, असा दावा केला जातोय. पण, आयपीएलचा नियम बदलला आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com