
Devdutt Padikkal remains overlooked by Team India: भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३ असा मार खावा लागला. फिरकी गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी हाराकिरी झालेली पाहायला मिळाली. तोच न्यूझीलंडचा रचीन रविंद्र हा चेन्नईत येऊन दोन आठवडे सराव केला आणि कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांना चोप दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १-० अशी आघाडी मिळवूनही भारताला मालिका १-३ अशी गमवावी लागली. त्यामुळे बीसीसीआय आक्रमक मोडमध्ये गेली आहे आणि आढावा बैठकीनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर भर दिला जात आहे. त्याचवेळी देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या खेळाडूंना मात्र 'वॉटर बॉय' म्हणून कामाला लावल्याचे चित्र दिसत आहे.