वेस्ट इंडिजने शे होपच्या नाबाद शतकाच्या जोरावर २० षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने ८७ धावांवर ४ विकेट्स गमावल्यावर टीम डेव्हिडने विस्फोटक खेळी केली.
टीम डेव्हिडने १६ चेंडूंत अर्धशतक व ३७ चेंडूंत शतक झळकावत नाबाद १०२ धावा केल्या.
Fastest T20I fifty and hundred by Tim David for Australia : बॅसेटेरेच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला... वेस्ट इंडिजच्या शे होपने शतक झळकावून ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य उभे केले, परंतु पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने ( Tim David) विक्रमी फटकेबाजी करून मॅच जिंकून दिली. ऑस्ट्रेलियाने २३ चेंडू व ६ विकेट्स राखून २१५ धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. डेव्हडिने या सामन्यात विक्रमांना गवसणी घातली.