Josh Hazlewood Five Wicket Haul vs West Indies : यजमान वेस्ट इंडिजला ७ झेल सोडणे महागात पडले.. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत जोरदार पुनरागमन करताना १५९ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जोश हेझलवूडने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत विंडीजचे कंबरडे मोडले आणि त्याला अन्य गोलंदाजांची चांगली साथ लाभली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. त्याचा फटका भारताला बसला आहे.