वेस्ट इंडिजने पाकिस्तानला २०२ धावांनी हरवत ३४ वर्षांनंतर घरच्या मैदानावर वन डे मालिका जिंकली.
शे होपने नाबाद १२० धावांची खेळी करत वेस्ट इंडिजचा डाव ६ बाद २९४ धावांपर्यंत नेला.
रोस्टन चेस, जस्टीन ग्रीव्हस आणि रुथरफरोर्ड यांनी होपला महत्त्वाची साथ दिली.
WI vs PAK 2025 ODI Series Final Match Highlights: शे होपच्या ( Shai Hope) च्या नेतृत्वाखाली युवा वेस्ट इंडिज संघाने बुधवारी इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी खिशात घातली. ३४ वर्षानंतर वेस्ट इंडिजने वन डे मालिकेत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. जेडन सिल्स ( Jayden Seales) या विजयाचा नायक ठरला.