

Harmanpreer Kaur | Women's T20 World Cup | India vs Pakistan
Sakal
इंग्लंडमध्ये सध्या महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला १२ जूनपासून सुरुवात झाली असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघही या स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारताचा पहिला सामना रविवारी (१४ जून) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅमला होईल. दरम्यान, दोन देशात गेल्यावर्षीपासून संबंध अत्यंत बिघडलेले आहेत, अशा पार्श्वभूमीवर या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष आहे.