Mumbai Indians latest update on Rohit Sharma captaincy
esakal
Mumbai Indians latest update on Rohit Sharma captaincy: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे आणि सध्या सर्व फ्रँचायझींमध्ये ट्रेडची चर्चा सुरू आहेत. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स या फ्रँचायझींनी आपल्या प्रशिक्षण स्टाफमध्ये बदल केले आहेत. तेच मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधारपदासाठी रोहित शर्माकडे जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली फ्रँचायझीला मागील ३ पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच हार्दिक व फ्रँचायझी यांच्यात तणाव वाढल्याच्या बातम्या आहेत. अशात रोहितकडे पुन्हा कर्णधारपद जाणार असल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले. यावर फ्रँचायझीने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.