Virat Kohli has firmly shut down speculation of a Test-cricket return
esakal
Is BCCI asking Virat Kohli to reverse his Test retirement? भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक होत आहे. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर त्यांनी ३-० अशी हार पत्करली आणि आता काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन २-० असा कसोटी विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे विराट कोहलीने कसोटीतून घेतलेली निवृत्ती मागे घ्यावी, अशी विनंती BCCI ने केल्याची चर्चा रंगली होती. कालच्या वन डे सामन्यानंतर विराटने त्यावर भाष्य केले आणि बीसीसीआयनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली.