Suryakumar Yadav’s comment about winning in Ahmedabad went viral
esakal
Viral video of Suryakumar Yadav speaking about Ahmedabad stadium: वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाले. सूर्याचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर प्रेक्षकांची गर्दी होती, घराबाहेरही राजकीय मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार आपल्या सूर्याची आतुरतेने वाट पाहत होते. सूर्याने मुंबईत येताच मीडियासोबतची गप्पा केल्या आणि या गप्पांमधील एक व्हिडीओ सध्या गाजतोय... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यावरून राजकारण रंगले होते.. भारतीयांसमोर २०२३च्या वर्ल्ड कप फायनलच्या कटू आठवणी उभ्या राहिल्या आणि सूर्यानेही आज त्यावरूनच दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.