

Deepti Sharma | India vs Thiland | Women's Asia Cup 2026
Sakal
India Women vs Thailand Women Marathi News: महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सुरुवात केली आहे. रविवारी (३० ऑगस्ट) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने थायलंड महिला संघाला ९४ धावांनी पराभवाचा धक्का दिला आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाज चमकल्या आहेत. विशेषत: नंदिनी शर्माने दमदार कामगिरी केली. तिला श्री चरणी आणि क्रांती गौड यांची साथ मिळाली. याशिवाय दीप्ती शर्माने विश्वविक्रमही केला.
या सामन्यात भारताने थायलंडसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडचा संघ १६.१ षटकात ६५ धावांवरच सर्वबाद झाला. त्यांच्याकडून फक्त नन्नपत कोंचरोएनकाई हिने झुंज देत दुहेरी धावसंख्या पार केली.