

Women's Asia Cup 2026
Sakal
Women's T20 Asia Cup Live Streaming Details : महिलांची आशिया करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून (२८ ऑगस्ट) दुबईत सुरू होत आहे. श्रीलंका गतविजेते असले तरी भारतीय संघाला विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसली तरी आशिया खंडातील संघांवर त्यांनी वर्चस्व राखलेले आहे, तसेच मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले असल्यामुळे भारतीय संघाचा दरारा आहे.
भारताचा स्पर्धेतील पहिला सामना ३० ऑगस्टला थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर भारतीय संघ ३ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध, तर बहुप्रतीक्षित पाकिस्तानविरुद्धचा सामना ५ सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे विशेष लक्ष असेल.