Pakistan women's team qualification scenario after defeat vs SA
esakal
Women's T20 World Cup semifinal qualification race: भारतीय संघाने पहिल्याच सामन्या दिलेल्या दणक्यानंतर पाकिस्तान महिला संघाला सावरणे अवघड झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना बुधवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचणे अशक्य झाले आहे आणि आता त्यांना गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तेच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नेट रन रेटच्या जोरावर मागे टाकून गुणतालिकेत टॉपर झाला आहे.