

Women's T20 World Cup
esakal
England vs Ireland and New Zealand vs Sri lanka: आयसीसी महिला विश्वचषक(ICC T20 World Cup) सध्या सुरू आहे. यामध्ये काल म्हणजेच १६ जून रोजी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काल ग्रुप ब मधील अत्यंत महत्त्वाच्या डबल हेडर सामन्यांमध्ये श्रीलंकेने गतविजेत्या न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला.
तर दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने आयर्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील आपले अपराजित स्थान कायम राखले. मात्र, श्रीलंकेच्या या विजयामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीची शर्यत आता अधिक रंजक बनली आहे.