India Women will take on Sri Lanka in a 5-match T20I series
esakal
India Women Take On Sri Lanka; Mandhana’s Participation in Doubt: वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला संघाचे सामने पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत आणि त्यांच्यासाठी बीसीसीआयने ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेचे आयोजन केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असल्याचे BCCI ने आज जाहीर केले. पण, या मालिकेत स्मृती मानधनाच्या ( Smriti Mandhana) समावेशाबाबत संभ्रम आहे. स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे ती क्रिकेटच्या मैदानावर केव्हा उतरेल, याचे उत्तर अद्याप मिळणे अवघड आहे.