
इंडियन प्रीमियर लीगशिवाय (IPL)आता जगभरात अनेक टी२० लीग स्पर्धा खेळल्या जातात. क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख देशांमध्ये त्यांची टी२० लीग स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धांची लोकप्रियता पाहाता आता २०१५ नंतर बंद पडलेली चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, पण ही स्पर्धा नव्या अवतारात सर्वांसमोर येण्यास सज्ज आहे.
आता वर्ल्ड क्लब चॅम्पियनशीप म्हणून ही स्पर्धा २०२६ मध्ये खेळवली जाणार आहे. पूर्वीपेक्षा ही स्पर्धा मोठी असेल आणि जगभरातील आघाडीच्या टी२० लीगमधील संघ एकत्र खेळताना दिसणार आहेत.