Virat Kohli surpassed Australian legend Michael Bevan
esakal
Virat Kohli List A average record after 5000 runs : १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी खेळणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. शुक्रवारी गुजरातविरुद्ध विराट कोहलीने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ६१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली आणि १३ चौकार आणि १ षटकार मारून ही खेळी स्फोटक केली. विराटने ७७ धावांची खेळी खेळली आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये एक नवीन विश्वविक्रम करण्यातही यश मिळवले.