Mumbai Indians Women: रविवारी १९ वर्षांखालील महिला आशिया कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला ९ विकेट्सने पराभूत केले. १९ वर्षांखालील संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताच्या विजयात १६ वर्षीय जी कामिलिनी हिने मोलाचा वाटा उचलला.
तिने पाकिस्तानने दिलेल्या ६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सर्वोच्च ४४ धावांची नाबाद खेळी केली. ही खेळी तिने २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह पूर्ण केली. दरम्यान, तिने ही खेळी केल्यानंतर अवघ्या दोन तासातच तिला आनंदाची बातमी मिळाली.