Harmanpreet Kaur Silences RCB Fans with a Stunning Performance – WPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना कमालीचा रोमांचक झाला. महिला प्रीमिअर लीग २०२५ मधील या लढतीत हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur ) मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनाच्या RCB ला १ चेंडू व ४ विकेट्स राखून पराभूत केले. मुंबईचा तिसऱ्या सामन्यातील हा दुसरा विजय ठरला, तर बंगळुरूचा हा पहिलाच पराभव ठरला. पण, हा सामना जिंकून हरमनप्रीत कौरने तिला डिवचणाऱ्या RCB Fans ना सडेतोड उत्तर दिले.