
Women's Premier League Royal Challengers Bengaluru Women vs Mumbai Indians Women : स्मृती मानधनाच्या दमदार सुरुवातीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव गडगडला. पण, पुन्हा एकदा एलिसे पेरी ( Ellyse Perry ) व रिचा घोष यांनी आणखी एकदा अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले. पेरीने ४३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८१ धावा केल्या. रिचा २८ व स्मृतीने २६ धावांचे योगदान दिले.