WPL इतिहातील पहिली Super-Over अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव! इक्लेस्टोन युपी वॉरियर्सच्या विजयाची शिल्पकार

UPW vs RCB: वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी पहिली सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानात युपी वॉरियर्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. युपीच्या विजयात इक्लेस्टोनने मोलाचा वाटा उचलला.
WPL 2025 | Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz
WPL 2025 | Royal Challengers Bengaluru vs UP WarriorzSakal
Updated on

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ९ वा सामना अत्यंत रोमांचक झाला. बंगळुरुला झालेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध थरारक विजय मिळवला. युपी वॉरियर्सच्या विजयात सोफी इक्लेस्टोनने फलंदाजी आणि गोलंदाजी, अशा दोन्ही विभागात योगदान देत मोलाचा वाटा उचलला. तीच युपीच्या विजयाची शिल्पकारही ठरली.

या सामन्यात बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १८० धावा करत युपीसमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात युपीलाही सर्वबाद १८० धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. यामुळे वूमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com