Mumbai Clinch First Win of WPL 2026
ESAKAL
Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिला विजय मिळवला. गतविजेत्यांना सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोमहर्षक लढतीत पराभूत केले होते. त्या सामन्यात त्यांच्याकडून बऱ्याच चुकाही झाल्या होत्या. पण, आज मुंबई इंडियन्स वेगळ्याच फॉर्मात दिसले आणि त्यांनी सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) आणि नॅट शिव्हर ब्रंट ( ७०) यांनी जोरदार फटकेबाजी करून मुंबईच्या विजयाचा पाया भक्कम केला. त्यावर निकोला केरी ( ३-३७) व एमेलिया केर ( ३-२४) यांनी कळस चढवला. शिव्हर ब्रंटने ( २-२९) फलंदाजीसह गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली.