Nadine de Klerk delivers a brilliant all-round performance as RCB clinch a thrilling win over defending champions Mumbai Indians
MI vs RCB WPL 2026 Marathi News : महिला प्रीमिअर लीग २०२६च्या पहिल्याच सामन्यात चुरस पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन माजी विजेते संघ समोरासमोर आले आणि त्यानिमित्ताने हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) व स्मृती मानधना ( Smriti Mandhana) या दोन स्टार खेळाडू एकमेकींविरुद्ध उभ्या राहिल्या. पण, या दोघींनी फार काही कमाल दाखवता आली नाही. RCB ने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून गतविजेत्या MI ला धक्का दिला. या सामन्यात RCB च्या Nadine de Klerk ने अष्टपैलू कामगिरी करून सर्वांची वाहवाह मिळवली.