GT vs UPW WPL 2026 : पदार्पणात चमकली अनुष्का, गार्डनरसह जोडल्या १०३ धावा; यूपीची धुलाई करणारी Anushka Sharma कोण?

Who is cricketer Anushka Sharma Gujarat Giants: महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स हा सामना विशेष गाजला तो अनुष्का शर्मा या नवख्या खेळाडूच्या दमदार पदार्पणामुळे. कर्णधार अ‍ॅश गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्सने फलंदाजी करताना अडचणीच्या क्षणी अनुष्का शर्मा हिने जबाबदारी स्वीकारली.
Who Is Cricketer Anushka Sharma? Gujarat Giants Debutant Shines With 103-Run Stand vs UP Warriorz

Who Is Cricketer Anushka Sharma? Gujarat Giants Debutant Shines With 103-Run Stand vs UP Warriorz

esakal

Updated on

Gujarat Giants Women set massive target vs UP Warriorz: मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय अनुष्का शर्माने ( Anushka Sharma) महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील तिचा पदार्पणाचा सामना गाजवला. WPL लिलावात या खेळाडूसाठी RCB नेही जोर लावला होता आणि गुजरात जायंट्सने तिच्यासाठी का मोठी रक्कम मोजली, हे आज समजले. कर्णधार अ‍ॅश गार्डनरसह तिने १०३ धावांची भागीदारी केली आणि यूपी वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर GT ने २०० पार धावांचे लक्ष्य उभे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com