
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC) स्पर्धेची सुरुवात जूनपासून झाली असून ऑस्ट्रेलियाने पहिल्याच मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.
या मालिकेतील ग्रेनडाला झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चौथ्याच दिवशी १३३ धावांनी जिंकला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पाँइंट्स टेबलमध्येही फायदा झाला आहे.