
क्रिकेटमध्ये अनेकदा विविध कारणांनी अडथळा येतो, बऱ्याचदा पाऊस यासाठी कारण ठरते. तर कधीकधी चाहत्यांकडून सुरक्षा मोडली जाते. अनेकादा असेही दिसले आहे की भटके कुत्रेही अचानक मैदानात येतात, अशावेळी खेळाडू त्यांना बाहेर काढतात.
सध्या ग्रेनडा येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान देखील असाच एक कुत्रा मैदानात शिरला होता, ज्यानंतर त्याच्यात आणि ड्रोन कॅमेरा यांच्यात पाठशिवणीचा खेळ पाहायला मिळाला.