
बुधवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यातून कसोटीमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.