
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून (११ जून) सुरू होत आहे. पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन क्रमांकावर राहिलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात हा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.