Australia vs South Africa in WTC Final 2025:दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती आणि त्यानंतर २७ वर्षांनी त्यांना आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावा हव्या आहेत. एडन मार्करम ( AIDEN MARKRAM ) आणि टेम्बा बवुमा यांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या छायेत लोटले आहे आणि आज WTC Final 2025 चा निकाल निश्चित आहे.