Australia vs South Africa in WTC Final 2025: गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत नाट्यमय वळणावर आली आहे. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चांगालच जोर लावताना सामना तीन दिवसांत संपवण्याची सोय केली आहे. पहिल्या दोन दिवसांत प्रत्येकी १४-१४ विकेट्स पडल्या आणि त्यामुळे तिसऱ्या दिवशी निकाल लागण्याची शक्यता बळावली आहे. मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc) दमदार अर्धशतक झळकावताना आफ्रिकेसमोर तगडे लक्ष्य उभे केले आहे.