How much will Team India earn in WTC Final 2025 : भारताची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सलग तिसरी फायनल खेळण्याची संधी गमावली असली तरी त्यांना आयसीसीकडून बक्कळ बक्षीस रक्कम मिळणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) यांनी WTC Final विजेत्या संघासाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली होती. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर फायनल होणार आहे. WTC 2023-25 Final साठीची एकूण बक्षीस रक्कम ही ५.७६ मिलियन डॉलर म्हणजेच ४९ कोटी, २६ लाख, ८१,६०० इतकी केली गेली आहे, जी यापूर्वीच्या दोन पर्वाच्या बक्षीस रकमेच्या दुप्पट आहे.