
WTC Final 2025 DRS controversy involving Bavuma
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी १४ विकेट्स गेल्याने सामन्यात रंगत आली आहे आणि दुसऱ्या दिवशी चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने कव्हर ड्राईव्हरून लॉफ्टेड चौकार खेचल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. ऑसी गोलंदाज जॉश हेझलवूड डोकं खाजवू लागला. पण, हेझलवूडने पुढच्याच चेंडूवर बवुमाला पायचीत पकडले. मैदानावरील अम्पायरने OUT ही दिले, परंतु चतुर बवुमाने DRS घेतला. त्यानंतर जे घडले, ते पाहून ऑसी खेळाडूच नव्हे, तर समालोचकही उडाले.