Updated WTC27 points table after NZ vs WI Test
esakal
Updated WTC27 points table after NZ vs WI Test: भारतीय संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यात जमा झाले आहेत. न्यूझीलंडने शुक्रवारी वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत ९ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारतासह पाकिस्तानलाही मोठा धक्का बसला आहे. किवींनी ५७ धावांचे लक्ष्य १ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. या विजयासह न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे आणि पाकिस्तान व भारत यांची घसरण झाली आहे.