MLC 2025 :San Francisco Unicorns to Miraculous Win Over MI New York
मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाला अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये विजयाचे खाते अजूनही उघडता आले नाही. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी कर्णधारपदी निकोलस पूरनच्या नावाची घोषणा केली. आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या पूरनच्या धावा MLC मध्ये आटल्या. त्याचा फटका संघाला बसतोय आणि आज त्यांचा सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून हार पत्करावी लागली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळलेल्या झेव्हियर बार्टलेटने ( Xavier Bartlett ) न्यू यॉर्कच्या तोंडचा घास पळवला.