Xavier Doherty: World Cup जिंकला, पण आज करतो सुतारकाम! ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूची थक्क करणारी कहाणी

Why Xavier Doherty became a carpenter after retirement: 2015 चा विश्वचषक विजेता झेवियर डोहर्टी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर समालोचन किंवा प्रशिक्षक न बनता सुतारकाम करत आहे. त्याच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी दुसऱ्या इनिंग्जची कहाणी जाणून घ्या.
Xavier Doherty

Xavier Doherty

esakal

Updated on

Why Xavier Doherty became a carpenter after retirement: क्रिकेट खेळताना लाखो चाहत्यांचं प्रेम मिळतं, नाव होतं, पैसा मिळतो. पण करिअर संपल्यानंतर अनेक खेळाडूंना नव्याने आयुष्य सुरू करावं लागतं. काही जण समालोचन करतात, काही प्रशिक्षक बनतात, तर काही जण क्रिकेटशी संबंधित काम करत राहतात.परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू झेवियर डोहर्टी याने सगळ्यांपेक्षा वेगळी वाट निवडली.

2015 मध्ये मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला, त्या संघात डोहर्टीचाही समावेश होता. पण क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्याने कोणतंही ग्लॅमरस काम निवडलं नाही. आज तो सुतारकाम करून आपलं आयुष्य जगत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com