

RCB confirm Yash Dayal will miss IPL 2026 but remains contracted with the franchise
esakal
RCB On Yash Dayal Absence From IPL 2026 : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला. संघातील मॅच विनर गोलंदाज यश दयाल यंदाच्या पर्वात RCB चा भाग नसेल, अशी घोषणा फ्रँचायझीचे संचालक मो बोबट यांनी केली. यश दयालच्या न खेळण्याच्या तपशिलात जाणे बोबाट यांनी टाळले, परंतु त्यांनी या परिस्थितीला “वैयक्तिक बाब” म्हटले. यंदाच्या पर्वात यश दयालच्या माघारीचे वृत्त सांगताना बोबाट यांनी पुनरुच्चार केला की, या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा फ्रँचायझीसोबतचा करार कायम आहे.