Yashasvi Jaiswal Double Century : विनोद अन् विराटनंतर यशस्वीच! द्विशतकाचा डबल धमाका, इंग्रजांची पळता भुई थोडी

Yashasvi Jaiswal Double Century Test Cricket Record : यशस्वीने सलग दुसरी द्विशतकी खेळी करत अनेक विक्रम मोडले
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal esakal

Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकत इतिहास रचला. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. भारताकडून यापूर्वी डावखुऱ्या विनोद कांबळीने (1993) सलग दोन कसोटी सामन्यात दोन द्विशतके ठोकली होती. त्यानंतर विराट कोहलीने (2017) देखील अशीच कामगिरी केली होती.

विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडविरूद्ध सलग दोन कसोटी सामन्यात दोन द्विशतकी खेळी करणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Yashasvi Jaiswal
Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : यशस्वीचं द्विशतक, सर्फराजची फटकेबाजी! इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान

यशस्वी जैस्वाल तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र यशस्वी चौथ्या दिवशी तो फलंदाजीला आला. त्याने शतकानंतर दीडशतकी मजल मारत आपण मोठी धावसंख्या उभारण्यासाठी खेळत असल्याचे संकेत दिले.

त्याला साथ देणाऱ्या सर्फराज खानने देखील आक्रमक फलंदाजी करत भारताची आघाडी वाढवण्यास सुरूवात केली. यशस्वीने बघता बघता द्विशतकी मजल मारली. त्याने या आपल्या 214 धावांच्या नाबाद खेळीत तब्बल 12 षटकार आणि 14 चौकार मारले. या खेळीत त्याने अनेक विक्रम देखील केले.

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा वसिम अक्रमच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली.

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  • 2024 - यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरूद्ध 12 षटकार

  • 1996 - वसिम अक्रम झिम्बाब्वेविरूद्ध 12 षटकार

  • 2003 - मॅथ्यू हेडन झिम्बाब्वेविरूद्ध 11 षटकार

  • 2002 - नॅथन अॅस्टले इंग्लंडविरूद्ध 11 षटकार

  • 2014 - ब्रॅंडन मॅक्युलम पाकिस्तानविरूद्ध 11 षटकार

  • 2014 - ब्रँडन मॅक्युलम श्रीलंकेविरूद्ध 11 षटकार

  • 2016 - बेन स्टोक्स दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 11 षटकार

  • 2023 - कुसल मेंडीस आयर्लंडविरूद्ध 11 षटकार

Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal Double Century : विनोद अन् विराटनंतर यशस्वीच! द्विशतकाचा डबल धमाका, इंग्रजांची पळता भुई थोडी

इ भारताकडून दुसऱ्या डावात द्विशतकी खेळी करणारे फलंदाज

  • 1964 - मन्सुर अली खान पतौडी - इंग्लंडविरूद्ध 203 धावा

  • 1965 - दुलीप सरदेसाई - वेस्ट इंडीजविरूद्ध नाबाद 200 धावा

  • 1971 - सुनिल गावसकर - वेस्ट इंडीजविरूद्ध 220 धावा

  • 1979 - सुनिल गावसकर - इंग्लंडविरूद्ध 221 धावा

  • 2001 - व्हीव्हीएस लक्ष्मण - ऑस्ट्रेलियाविरूद्ध 281 धावा

  • 2006 - वसिम जाफर - वेस्ट इंडीजविरूद्ध 212 धावा

  • 2024 - यशस्वी जैस्वाल - इंग्लंडविरूद्ध नाबाद 214 धावा

भारताकडून सलग दोन कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणारे फलंदाज

  • 1992/93 - विनोद कांबळी - इंग्लंड अन् झिम्बाब्वेविरूद्ध द्विशतक

  • 2017/18 - विराट कोहली - श्रीलंकेविरूद्ध सलग दोन द्विशतके

  • 2023/24 - यशस्वी जैस्वाल - इंग्लंडविरूद्ध सलग दोन द्विशतके

भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 430 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे अवाढव्य आव्हान ठेवले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वीच्या नाबाद 214 धावांव्यतिरिक्त शुभमन गिलने 91 धावांचे योगदान दिले. तर सर्फराज खानने नाबाद 68 धावा केल्या. इंग्लंडकडून रूट, हार्टली आणि अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com