Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Team India Opening Slot Headache: अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत यशस्वी जैस्वालने शतक ठोकले आहे. त्यामुळे भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यापूर्वी डोकेदुखी वाढली आहे. याबाबत शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.
Shubman Gill on Team India Opening Slot Headache

Shubman Gill on Team India Opening Slot Headache

Sakal

Updated on

Team India Opening Race: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) संघात वनडे मालिका झाली, ज्यात भारतीय संघाने ३-० फरकाने विजय मिळवला. तिसरा आणि अखेरचा वनडे सामना चेन्नईत पार पडला. भारताने हा सामना ९ विकेट्सनेच जिंकला. भारताच्या विजयात यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मोलाचा वाटा उचलला.

या दोघांमध्ये २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला १७० धावांची भागीदारी झाली. जैस्वालने ८६ चेंडूतच ११० धावांची खेळी केली. हे त्याचे दुसरेच वनडे शतक होते. त्याने ६ व्या डावात शतक केले. रोहित शर्माने ६९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. रोहितने पहिल्या दोन सामन्यात १६ आणि ४८ धावा केल्या होत्या.

Shubman Gill on Team India Opening Slot Headache
IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com