
भारतीय कसोटी संघाने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज चमकले आहेत.
त्यातही केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने पहिल्याच दिवशी प्रभावित केले आहे. या सामन्यापासून शुभमन गिलच्या नेतृत्वातालाही सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात यशस्वी जैस्वालने खणखणीत शतक ठोकलं आहे. यासह त्याने अनेक विक्रमही केले.